यशाची चढती कमान

Yashachi chadhati kaman

शिक्षण संकुलामधील विद्यार्थी - विद्यार्थिनी विविध क्षेत्रांमध्ये भरघोस यश मिळवीत आहेत. शिक्षण संकुल उभारण्यामागचे उद्दीष्ट सफल होत असल्याचेच हे दर्शविते. येथील प्रत्येक महाविद्यालयात निरनिराळे प्रयोग केले जातात व त्यांना विद्यार्थी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची राष्ट्र स्तरावर कबड्डी स्पर्धेसाठी निवड, कृषी तंत्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धावणे, गोळा फेक, लांब उडी, अशा विविध मैदानी स्पर्धांमध्ये मिळविलेले यश, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत सन २००८ मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत महाविद्यालयाचे आठ विद्यार्थी यशस्वी झाले. आवर्जून उल्लेख करावा अशी बाब म्हणजे लोकमंगल महाविद्यालयाद्वारे देशात प्रथच घेतल्या गेलेल्या बी.एससी उद्योजकता या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी १००% यश संपादन केले. सर्वांना अभिमान वाटेल अशीच ही गोष्ट. जैव तंत्रज्ञान या विद्याशाखेमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत संकुलातील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच याच अभ्यासक्रमामध्ये संकुलातील एका विद्यार्थ्यास शेफील्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड ची शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

या शिक्षण संकुलाने आपल्या गुणवत्तेमध्ये सातत्य राखल्याने, आपला पाया व्यापक केल्यानेच संस्थेला हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.