शिक्षण संकुल - वडाळा

wadala Sankul

वडाळा येथे असणार्‍या या शिक्षण संकुलामध्ये अॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्पुटर सायन्स, बायोइन्फॉर्मेटिक्स अशा विविध पदवी व पदविका अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. 'उद्योजकता विकास' या विषयातील बी.एससी चा पदवी अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहे. आवर्जून उल्लेख करावा अशी गोष्ट म्हणजे, 'बी.एससी इन आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट' हा पदवी अभ्यासक्रम शिकविणारे लोकमंगल हे देशातील पहिले कॉलेज आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे घेतला जाणारा एम.एससी अभ्यासक्रमही येथे शिकविला जातो. व्यवसायाभिमुख शिक्षण देणारे विविध अभ्यासक्रम येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकविले जातात. कोपा, वायरमन, इलेक्ट्रिशियन यांसारखे अभ्यासक्रमही चालविले जातात. सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी येथे एक स्वतंत्र प्रशिक्षण प्रबोधिनी येथे कार्यरत आहे.

नावीन्य, प्रयोगशीलता, रोजगाराभिमुखता यांमुळे या शिक्षण संकुलास समाजातून मोठी पसंती प्राप्त होत आहे. येथील विद्यार्थी आश्वस्त होऊन शिक्षण घेत आहेत. शेतकर्‍यांच्या मुलांमध्ये उपजतच असणार्‍या शेतीविषयक ज्ञानाला आधुनिकतेची जोड दिल्यास प्रगतीचा मार्ग आणखी सुकर होईल.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.