प्रशिक्षण प्रबोधिनी

Prashikshan prabodhini

आज समाजात असणारी रोजगार निर्मितीसाठी योग्य प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन लोकमंगल प्रशिक्षण प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली. या प्रबोधिनीच्या माध्यमातून स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोकमंगल परिवरातील कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या बरोबरीने समाजातील शाळाबाह्य घटकांनाही प्रशिक्षण मिळावे, त्यांचा कौशल्य विकास व्हावा, त्यांना नव्या संधींचा लाभ व्हावा हा या प्रबोधिनीचा उद्देश होय. सर्वसाधारण प्रवर्गातील बेरोजगारांसाठी मोफत उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते.

गांडूळ खत निर्मिती, दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, शेळी पालन, फळ प्रक्रिया, मसाले उत्पादन प्रशिक्षण अशा अनेक उद्योगांचे प्रशिक्षण येथे दिले जाते. यासह आर्थिक दुर्बल घटकांसाठी तसेच महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजनही केले जाते. पेपर कन्व्हर्जन, वॉलपेपर पेस्टिंग, कागदी पिशव्या यांसारख्या उद्योगांचे तांत्रिक प्रशिक्षणही येथे दिले जाते. महिलांमध्ये उद्योजकता विकसित व्हावी, उद्योगात येणार्‍या अडचणी सोडविण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान त्यांना मिळावे या दृष्टीने महिला बचत गटांना विशेष व्यवसाय प्रशिक्षण पुरविले जाते. केवळ प्रशिक्षणच नव्हे तर व्यवसायला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी प्रबोधिनीतर्फे विनातारण, बिनव्याजी कर्ज योजनेसाठी कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले.

व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.