किल्ले बांधणी स्पर्धा

Kille bandhani spardha

भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास शिकताना, समजून घेताना येथील गड किल्ले मोठी मोलाची भूमिका बजावतात. नव्या पिढीमध्ये इतिहासाबद्दल प्रेम निर्माण होण्यातही या गड किल्ल्यांचा मोठा वाटा असतो. हे लक्षात घेऊन विद्यार्थी वर्गामध्ये इतिहास व आपले गड किल्ले यांविषयी गोडी वाढावी यासाठी लोकमंगल प्रतिष्ठान व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले जाते. पुस्तकी ज्ञानाच्या पुढे जाऊन किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जातो.


व्हिजन सोलापूरमध्ये सहभागी होण्यासाठी व आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.